दांडगुरी :

     दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील म्हसळा तालुक्यातील गोंडघर येथे राहणारे हरिशचंद्र शिलकर वय 41 याचे व त्याचा काका आरोपी मदन शिलकर वय 61 याचे घरगुती किरकोळ कारणावरून झालेल्या वादामध्ये काका ने पुतण्यावर कोयतीने  डाव्या कानाजवळ वार केल्याची घटना घडली यामध्ये हरीश्चंद्र जबर जखमी झाला असून आरोपी मदन यास पोलीसानी अटक केली आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गोंडघर या गावामध्ये राहणारे धोंडू सुंदर शिलकर यांनी दिघी सागरी पोलीस ठाण्या मध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा मुलगा हरिश्चंद्र शिलकर व त्यांचा भाऊ मदन यांच्या मध्ये दुपारी 12:30 च्या दरम्यान जेवण करण्याच्या किरकोळ वादातून वाद झाला यामध्ये मदन शिलकर याला राग अनावर न झाल्याने घरातील धारदार कोयतीने हरिश्चंद्र च्या डाव्या कानाजवळ जोरदार वार केला यामध्ये हरिश्चंद्र रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडून बेशुद्ध झाला जखमी अवस्थेमध्ये हरिश्चंद्र यास बोर्ली पंचतन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आले परंतु त्याची प्रकृती गँभीर असल्याने त्यास अलिबाग येथे जिल्हा रुग्णालयामध्ये पुढील उपचारार्थ दाखल केले आहे सध्या जखमी हरिश्चंद्र ची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. तर हरिश्चंद्र याचा काका मदन यास पोलिसांनी अटक केली असून भादवी कलम 324 अन्वये गुन्हा दाखल केला आहे तर याचा अधिक तपास स.पो.निरीक्षक महेंद्र शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली श्री देवकुळे करीत आहेत.

अवश्य वाचा

दीव येथील जमीन घोटाळा