events

टिकटॉकच्या माध्यमातून अनेक छूप्या कलाकारांना डिजिटल प्लॅटफॉर्म मिळाले असून कमीत कमी वेळात स्वतःला जास्तीत जास्त उत्कृष्टपणे सादर करण्याची कला अवगत करण्याची संधी देखील मिळाली आहे. या स्पर्धेतून महाराष्ट्रातील पहिली सशक्त स्पर्धा होऊ शकली. हे सांगतानाच मोबाईल आपण वापरला पाहिजे मोबाईलने आपल्याला वापरता कामा नये असा सल्ला पीएनपी सहकारी सांस्कृतीक कलाविकास मंडळाच्या अध्यक्षा तथा नगरसेवीका चित्रलेखा पाटील यांनी दिला. 

पीएनपी सहकारी सांस्कृतिक कला विकास मंडळ अलिबाग यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील पहिली   टिक टॉक स्पर्धा रविवारी पीएनपी नाटयगृहात मोठया उत्साहात पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. या स्पर्धेत अन्नाची नासाडी टाळण्याचा संदेश देणार्‍या मनिष प्रधान आणि त्यांच्या टिमने सादर केलेल्या टिकटॉक व्हिडीओला प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले. नगराध्यक्ष प्रशांत नाईक, चित्रलेखा पाटील, युवा नेते सवाई पाटील, नगरसेवक अनिल चोपडा, संजना किर, कुमार थत्ते यांच्या उपस्थितीत विजेत्यांना बक्षिस वितरण करण्यात आले.

शेकडो रायगड जिल्ह्यातील स्थानिक तरुणांसोबतच मुंबई, ठाणे येथील स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यापैकी निवडक 50 जण अंतिम फेरीसाठी पात्र ठरले त्यातील सर्वोत्कृष्ट व्हिडीओ बनवणार्‍या युवकांना गौरविण्यात आले यात. मनिष प्रधान प्रथम क्रमांक, आस्वाद घरत द्वितीय क्रमांक, शुभम पवार तृतीय क्रमांक तसेच उत्तेजनार्थ पुरस्कार पलक ढेडीया, शुभम खरीवले, जागृती कटकर यांना देण्यात आले. यास्पर्धेचे परिक्षण लोकप्रिय टिकटॉक मेकर अस्लम शहा, दिग्दर्शक कलाकार किरण साष्टे, नृत्य दिग्दर्शक जयेश पाटील यांनी केले. यावेळी नाटय कलाकार योगेश पवार, विक्रांत वार्डे, जयेश पाटील, अस्लम शहा, किरण साष्टे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचलन टिव्ही स्टार प्रतिम सुतार यांनी केले.

 

बॉक्स

टिकटॉक स्पर्धेच्या माध्यमातून अलिबागकरांना अशोक सराफ, जॉनी लिवर, अक्षय कुमार, सुनील शेट्टी, परेश रावल, भाऊ कदम, प्रियांका चोप्रा, इंदूरीकर महाराज यांचे धम्माल संवाद अनुभवता आले. त्याचप्रमाणे युवराज नृपाल पाटील, ओजस आस्वाद पाटील यांनी देखील आपले व्हिडीओ सादर करुन वाहवा मिळवली. या स्पर्धेत विविध संवाद, गाणी, नृत्य, विनोदी किस्से यांनी पीएनपी नाटयगृहात धम्माल उडवील होती.  

 

अवश्य वाचा