Politics - Narendra Modi

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

केवळ एका मंत्रिपदावर बोळवण होणार असल्याचं माहीत झाल्यानंतर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारमध्ये सहभागी न झालेल्या नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील जेडीयूची नाराजी अद्यापही दूर झालेली नाही. मोदी सरकारला आमचा केवळ बाहेरून पाठिंबा राहिल. आम्ही भविष्यातही मोदींच्या मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही, असा इशारा जेडीयूने दिला आहे. त्यामुळे जेडीयू आणि भाजपमध्ये धूसफूस सुरू झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. केंद्रात मोदी सरकार स्थापन होण्यापूर्वी नितीशकुमार यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यावेळी शहा यांनी एनडीएच्या घटक पक्षातील प्रत्येक पक्षाला केवळ एकच मंत्रिपद देण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यावर मंत्रिमंडळात सांकेतिक प्रतिनिधीत्वाची गरज नसल्याचं नितीशकुमार यांनी शहा यांना स्पष्ट केलं होतं. नितीशकुमार यांच्या या भूमिकेला जेडीयूनेही पाठिंबा दिला होता. 

अवश्य वाचा