अलिबाग 

      रायगड जिल्हा परिषदेचे चतुर्थ कर्मचारी व वाहन चालक हे कामावर असताना दिलेला गणवेश परिधान न करता सामान्य पोशाखात कार्यालयात उपस्थित असतात. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी चतुर्थ श्रेणी कर्मचारी व वाहन चालक कार्यालयात उपस्थित असताना दिलेला गणवेश परिधान करणे बंधनकारक आहे अन्यथा शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असे परिपत्रक काढले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी व वाहन चालक आता गणवेश मध्ये दिसतील अशी आशा निर्माण झाली आहे. 

      जिल्हा परिषद म्हणजे जिल्ह्याची मिनी विधानसभा असते. जिल्हा परिषदमध्ये बांधकाम, अर्थविभाग, समाजकल्याण, शिक्षण, कृषी, आरोग्य हे विभाग असून या विभागात चतुर्थ श्रेणी कर्मचारी तसेच मुख्य विभागातील अधिकारी यांच्या वाहनवरील वाहन चालक यांना शासन निर्णयानुसार विहित करून दिलेले गणवेश परिधान करणे बंधनकारक आहेत.

       जिल्हा परिषद मधील चतुर्थ श्रेणी कर्मचारी व वाहन चालक हे कार्यलयीन वेळेत गणवेश परिधान न करता अन्य गणवेशात काम करीत असतात ही बाब लक्षात आली आहे. त्यामुळे वाहन चालक व चतुर्थ श्रेणी कर्मचारी कोण हे ओळखणे कठीण जाते. यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी परिपत्रक काढून वाहन चालक व चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांनी दिलेला गणवेश परिधान करणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे. तसेच या सूचनांचे पालन न करणार्‍या कर्मचारी व वाहन चालक यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असे परिपत्रकात म्हटले आहे.

       जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काढलेल्या या परिपत्रकानंतर चतुर्थ कर्मचारी व वाहन चालक आदेशाचे किती पालन करतात हे पाहणे औचिक्याचे ठरणार आहे. मात्र आदेश न पाळल्यास शिस्तभंगाची कारवाई होणार हे मात्र नक्की.

अवश्य वाचा

शिघ्रे नदी बनलेय डंम्पिंग.