अलिबाग तालुक्यातील पोयनाड येथिल महावितरण कार्यालयात पंच कोशीतील शेतकरी कामगार पक्षाचे युवा कार्यकर्ते ,जेष्ठ नागरिक, ग्रामस्थ, तसेच व्यापारी वर्ग यांच्या प्रमुख उपस्थिती मद्यें रा जी प सददशा चित्रा ताई पाटील,प स सददश रचना म्हात्रे,प स सददश प्रमोद ठाकूर, सरपंच शहाबाज धनंजय म्हात्रे, माजी सरपंच आंबेपुर चे शैलेश पाटील,सरपंच पोयनाड शकुंतला काकडे,पत्रकार प्रकाश म्हात्रे,उद्योजक सुरेश म्हात्रे,विनोद पाटील, महेंद्र पाटील,    पत्रकार जीवन पाटील,प्रकाश जेएन, भूषण चवरकर,अनिल बांगर, सत्यम म्हात्रे,जिल्हा शे ,का प, सददश खेळुराम भोईर, अँड,डी, आर,पाटील,सुशील पाटील,सायली पाटील,रसिका पाटील मॉर्निंग ग्रुप आंबेपुर चे       सर्व पदादीकरी वाघोडे उप सरपंच संतोष पवार,बॉडी बिल्डर अमित पाटील,डी, एम पाटीलआदी मान्यवरांच्या उपस्थितीत महावितरण पोयनाड 1चे सहाय्यक अभियंता अर्जुन सातपुते यांना निवेदन सादर करण्यात आले याचे नेतृत्व जी प सददशा चित्रा ताई पाटील यांनी केले दीडशे हुन आदिक कार्यकर्ते  या वेळी उपस्थित होते.

        मागील महिन्या पासून वारंवार विद्दुत पुरवठा खंडित होत आहे त्यामुळे पोयनाड, पेझारी, आंबेपुर, वाघोडे, शहाबाज, भाकरवड, देहेन, व इतर पंचयक्रोशातील गावांमध्ये विद्दुत पुरवठ्या चा विशेषतहा पोयनाड परिसरातील लहान लहान व्यवसाहिक ,व्यापारी, फळ,भाजी,आईस्क्रीम, मत्स्यव्यवसाय यांना वारंवार वीज पुरवठा खंडित झाल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन आर्थिक फटका बसत आहे या बाबतीत तक्रार दाखल करण्या करिता महावितरण कार्यालयात गेल्यास कोणीही जबाबदार व्यक्ती उपलब्ध नसल्याने गैरसोय होत आहे व भ्रमणध्वनी वरून संपर्क केला असता तोही उपलब्ध नसतो तसेच अपुरे मनुष्यबळ, अनेक ठिकाणी विद्यत पोल, केबल,सडल्याने   सातत्याने पाठपुरावा करून सुद्दा सहकार्य मिळत नाहीत याच अनुषंगाने येथील कार्यालयात रा जी प  सददशा चित्रा ताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली महावीरण पोयनाड च्या कार्यालयावर तमाम कार्यकर्ते च्या उपस्थिती मद्ये निवेदन देण्यात आले.

      तर संबधित सहायक अभियंता अर्जुन  सातपुते यांनी मी वरिष्ठांना बोलून याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर मार्ग काढला जाईल असे सांगितले व वरिष्ठ अधिकारी तपासे यांच्या बरोबर फोन वरून सवांद साधला असता योग्य तो सहकार्य न मिळाल्याने तीव्र आंदोलन करणार असल्याचे चित्रा ताई यांनी सांगितले.

अवश्य वाचा

शिघ्रे नदी बनलेय डंम्पिंग.