अलिबाग दि.11

       राज्याचे बंदरे,वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण हे शनिवार दि.13 रोजी रायगड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.

       शनिवार दि.13 रोजी सकाळी दहा वा. महाड येथे आगमन व महाड येथील विकास कामांबाबत आढावा बैठक, स्थळ-शासकीय विश्रामगृह महाड, जि.रायगड. सकाळी 11 वा.  महाड औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांचे युनिट हेड यांचे समवेत बैठक, स्थळ- शासकीय विश्रामगृह महाड,जि.रायगड.दुपारी 12 वा. भारतीय जनता पार्टी पक्ष कार्यालय, महाड चे उद्घाटन. स्थळ-श्रीराम मंदिरासमोर, चवदार तळे महाड, जि.रायगड. दुपारी साडेबारा वा. 194 महाड विधानसभा मेळावा. स्थळ- श्री विरेश्वर मंदिर, महाड. दुपारी दोन ते तीन राखीव. दुपारी तीन वाजता महाड येथून माणगांवकडे प्रयाण. दुपारी चार वा. माणगांव येथे आगमन व माणगांव शिक्षण प्रसारक मंडळाच्या नवीन विस्तारीत इमारतीचा उद्घाटन सोहळा. स्थळ-अशोकदादा साबळे विद्यालय, माणगांव, जि.रायगड. दुपारी साडेचार वाजता माणगांव येथून पलावा डोंबिवली निवासस्थानी प्रयाण.

अवश्य वाचा

शिघ्रे नदी बनलेय डंम्पिंग.