अलिबाग  

      शासनाकडून मागण्या मंजूर होऊनही त्यांची पूर्तता होत नसल्याने आज रायगड (कुलाबा) जिल्हा महसूल अराजपत्रित सरकारी कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून महसूल कर्मचार्यांनी आज दुपारी जेवणाच्या सुट्टीत आंदोलन केले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर कर्मचार्यांची निदर्शने झाली.

       राज्य महसूल कर्मचारी आ@गस्ट २०१३ पासून राज्य शासनाकडे आपल्या मागण्यांसाठी पाठपुरावा करीत आहेत. तेव्हापासून सातत्याच्या पाठपुराव्यानंतर महसूल कर्मचार्यांच्या मागण्या शासनाने मान्य केल्या. मात्र सहा वर्षांचा कालावधी होवूनही त्यावर शासनाकडून अद्यापपर्यंत कोणताही शासन निर्णय न झाल्याने मागण्यांची पूर्तता होऊ शकलेली नाही. त्यामुUे कर्मचार्यांनी पुन्हा एकदा आंदोलनास सुरÀवात केली आहे.

        आज, दि. ११ जुलैपासून पुढे सात टप्प्यात हे आंदोलन होणार आहे. आज पहिल्या दिवशी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने, तहसील कार्यालयांवर मागण्यांबाबत फलक लावून आंदोलन झाले. दि. २३ जुलै रोजी घंटानाद, ३० जुलै रोजी काÈया फिती लावून काम, ९ आ@गस्ट रोजी सायंकाUी एक तास जास्त काम करÀन निषेध, १६ आ@गस्ट रोजी लेखणी बंद, २१ आ@गस्ट रोजी सामुदायिक रजा, २८ आ@गस्ट रोजी लाक्षणिक संप आणि दि. ५ सप्टेंबर रोजी बेमुदत संप अशा प्रकारे आंदोलने होणार आहेत.

       आज पहिल्या दिवशी रायगड (कुलाबा) जिल्हा महसूल अराजपत्रित सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष राकेश सावंत यांच्या नेतृतवाखाली जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशद्वारावर दुपारी जेवणाच्या सुट्टीत निदर्शने करण्यात आली व जिल्हाधिकारी डा@. विजय सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले. यावेUी मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.

          कर्मचार्यांच्या मागण्यांमध्ये नायब तहसीलदारांचा ग्रेड पे ४३०० वरÀन ४६०० करावा. महसूल लिपिकाचे पदनाम बदलून महसूल सहाय्यक करावे. नायब तहसीलदार संवर्गातील सरUसेवा भरतीचे प्रमाण ३३ वरÀन २० टक्के करावे. अव्वल कारकून (वर्ग ३) या संवर्गाच्या वेतन श्रेणीतील त्रुटी दूर कराव्यात. शिपाई संवर्गातून तलाठी संवर्गात पदोन्नती द्यावी. दांगट समितीने सादर केलेल्या अहवालानुसार पदे मंजूर करावी. रोहयो सारख्या विभागांसाठी नव्याने आकृती बंध तयार करावा. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महसूल कर्मचार्यांना पाच टक्के जागा आरक्षित ठेवाव्यात यांचा समावेश आहे.

अवश्य वाचा

शिघ्रे नदी बनलेय डंम्पिंग.