उरण

      रयत शिक्षण संस्थेचे,तु.ह.वाजेकर विद्यालय फुंडे येथील विद्यार्थ्याची गुरुवार दि.11 जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त बोकडविरा गावात वारकरी दिंडी व वृक्षदिंडी उत्साहाने संपन्न झाली.

      आषाढी एकादशी म्हणजे अवघ्या महाराष्ट्रचा पवित्र सोहळा मानला जातो.अवघे महाराष्ट्र विठुरायाच्या जयघोषाने  दुमदुमले आहे. या जयघोषात भर म्हणून फुंडे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनीही वारकरी दिंडी व वृक्षदिंडीचे आयोजन केले. सकाळी विद्यालयाचे चेअरमन श्री.कृष्णाजी कडू,प्राचार्य श्री. एम.एच.पाटील,उपमुख्याध्यापक श्री.खाडे सर,पर्यवेक्षक श्री.जी.सी.गोडगे,सौ.मांडवकर मॅडम या मान्यवरांच्या शुभहस्ते विठुरायाच्या पालखीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर कु.दीक्षिता.प्रीती आणि अमीषा या विद्यार्थिनींनी  विठ्ठलाचे अभंग सादर केले.लेजिम पथकाद्वारे विठ्ठल रखुमाईला अभिवादन करण्यात आले.नंतर विठ्ठालाची आरती घेवून पालखीचे प्रस्थान बोकडविरा गावाच्या दिशेने करण्यात करण्यात आले. 

        ‘झाडे लावा,झाडे जगवा’ आणि ‘जय जय विठ्ठल,जय हरी विठ्ठल’ अशा घोषणा देत ही वारकरी दिंडी आणि वृक्षदिंडी बोकडविरा गावात पोहचली.बोकडविरा गावचे जागृत देवस्थान म्हणजे गणेश मंदिर येथे दिंडीचे आगमन झाल्यावर बोकडविरा ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ कमिटीने दिंडीचे मनोभावे स्वागत केले.पालखीने श्री गणेशाचे दर्शन घेतल्यानंतर मंदिरात कु.मृदुला आणि मंदार म्हात्रे या विद्यार्थ्यानी विठ्ठलाचे अभंग गाऊन बोकडविरा ग्रामस्थांना तल्लीन केले.बोकडविरा गावाचे सरपंच सौ.मानसी पाटील,उपसरपंच शीतल पाटील,सर्व ग्रामपंचायत सदस्य,ग्रामसुधारणा कमिटी अध्यक्ष श्री.सूर्यकांत पाटील,रा.स.पाटील गुरुजी,कृष्णकांत पाटील गुरुजी, श्री.यशवंत ठाकुर,श्री.लक्ष्मण पाटील  तसेच बोकविरा गावचे ग्रामस्थ मंडळ यांनी फुंडे हायस्कूलच्या अधिकारी वर्गाचे स्वागत केले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यातआला.चेअरमन कृष्णाजी कडू यांनी बोकडविरा ग्रामस्थांना त्यांच्या उत्तम सहकार्याबद्दल धन्यवाड दिले.शेवटी आरती म्हणून ही दिंडी संपूर्ण बोकडविरा गावात फिरून पुन्हा  फुंडे हायस्कूल येथे पोहचली व दिंडीची सांगता झाली. 

         या दिंडीत विद्यालयाचे सर्व विद्यार्थी आणि सर्व सेवक वृंद सहभागी झाले होते.विद्यालयाच्या सर्व अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभागप्रमुख सौ.दर्शना माळी व सर्व सेवक वृंद यांनी या सोहळ्याचे नियोजन  केले होते. 

 

अवश्य वाचा

उरणमध्ये युतीला ग्रहण

उरणकर तापानी फणफणले