रोहा अष्टमी 

      महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वाना अनुसरून रोहे येथील कोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डॉ.चिंतामणराव देशमुख वाणिज्य व सौ.कुसुमताई ताम्हणे कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाने तंबाखू व्यसनमुक्तीसाठी सामुहिक शपथ कार्यक्रम आयोजित केला होता.

        सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख शत्रुघ्न लोहकरे,  भूगोल विभागाचे प्रमुख प्रा. अनिल शिंदे,वाणिज्य विभागाचे प्रमुख डॉ. कमलाकर कांबळे, प्रा.सुकुमार पाटील,प्रा. सीमा भोसले, प्रा. डॉ.सम्राट जाधव.प्रा. अनंत थोरात.आदी मान्यवर उपस्थित होते.

      सदर कार्यक्रमच्या सुरवातीलामहाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचेकार्यक्रमआधिकारीप्रा.तुळशीदास मोकल यांनी आपल्या प्रास्ताविकात महाराष्ट्र शासनाने हा कार्यक्रम सम्पूर्ण महाराष्ट्रातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयलयां मध्ये का आयोजित केला आहे याचा उद्देश स्पष्ट केला व उपस्थितांना तंबाखू सेवनाच्या दूष परिणामाची व हे व्यसन सोडविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनानं ची माहिती सांगितली.

      नंतर त्यांनी उपस्थिताना शासनाने दिलेल्या विहीत नमुन्यातील शपथ दिली.सदर कार्यक्रमास महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे व महाविद्यालयाच्या इतर विभागाच तीनशे पन्नास स्वयंसेवक उपस्थित होते. 

    कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयं सेवकांनी अखंड मेहनत घेतली.

अवश्य वाचा

शिघ्रे नदी बनलेय डंम्पिंग.