मोहोपाडा

      रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळा मोहोपाडा यांच्यावतीने आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांनी विठू माउलीच्या जयघोषात  पायी दिंडी काढली. ही दिडी मोहोपाडा परीसरातून गुरुवार दि.११  रोजी दुपारच्या सुमारास फिरविण्यात आली.विद्याथ्यांत  भक्तीभाव,संतवचनाचा आणि संतमहीमा रुजावा आणि थोर भारतीय संस्कृतीचे दर्शन व्हावे.याकरीता वासांबे मोहोपाडा रायगड जिल्हा परिषद शालेतील विद्यार्थ्यांनी शालेतून मोहोपाडा मुख्य बाजारपेठ तेथून नविन पोसरी बाजारपेठेतून पुन्हा राजिप शाला अशी पायी दिंडी काढण्यात आली.या दिडींत दोनशेहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.विद्याथ्यानी वारकरी संप्रदायाचा वेश परिधान केल्याने तर मुलींनी हिरवी साडी नेसून डोक्यावर तुळस घेतल्याने वारी पंढरीला निघाली असे दृश्य पहावयास मिळाले.या पायी दिंडीत लहानगे वारकरी टाल मृदुंगाच्या गजरात  हरीनामाचा गजर करीत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम या गजरात निघाली.

    "संतवचनाचा भाव ज्याचे अंतरी!दिसे तयासी पंढरी"  विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी हाच यामागचा उद्देश असल्याचे शिक्षक महेंद्र जाधव यांनी सांगितले.

   या दिंडी सोहळ्यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक महेंद्र जाधव,संजय कोंडीलकर, राजेंद्र जोशी ,श्रीमती वंदना जाधव श्रीमती जानकी येवले ,श्रीमती रुपाली पाटील, श्रीमती फड आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुवर्णा जाधव आदी सहभागी झाले होते.

अवश्य वाचा