पंढरपूर

       ‘शेतकरी व वारकरी यांच्यासाठी स्वेरी, शासनाच्या बी.ए. आर.सी., बायफ आणि ग्रामीण संसाधन मानव विकास केंद्र यांच्यातर्फे  संयंत्र, उपकरणे, बी- बियाणे व  प्रदर्शन व विक्री ही योजना शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांना अत्यंत लाभदायी असून स्वेरीची ही योजना शेतकऱ्यांच्या हिताची आहे. वारीच्या माध्यमातून माऊलींची सेवा करण्याचा स्वेरीचा हा उपक्रम स्तुत्य आहे. बियाणे, माती व पाणी परीक्षण संयंत्र अशा अनेक प्रकारची उपकरणे प्रदर्शनात उपलब्ध करून देताना शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करताना ग्रामीण जनतेला अधिकाधिक उर्जा देण्याचे कार्य स्वेरी करते.’ असे प्रतिपादन आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे क्षेत्रीय महामंत्री देवदत्त जोशी यांनी केले.

 

        स्वेरी पंढरपूर, भाभा अणुसंशोधन केंद्र मुंबई, बायफ पुणे आणि एम.के.सी.एल. नॉलेज फौडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सिलेज विकास प्रकल्प’ अंतर्गत ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी विविध ग्रामीण व कृषी तंत्रज्ञान यांचे प्रदर्शन व विक्रीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहेत. या प्रदर्शन व विक्रीच्या उदघाटन प्रसंगी क्षेत्रीय महामंत्री देवदत्त जोशी हे शेतकरी, वारकरी आणि नागरिकांना मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे होते. स्वेरीच्या संशोधन विभागातून मागील पाच वर्षापासून गोपाळपूर येथे आषाढीवारी दरम्यान ग्रामीण व कृषी तंत्रज्ञान प्रदर्शन दरवर्षी राबविले जाते. या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागामध्ये तंत्रज्ञान आधारित विकास गंगा गावागावांपर्यंत पोहचावी व गावातील व शहरामधील अंतर पडत असलेली दरी कमी व्हावी हा आहे. भारताचे जेष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर, शास्त्रज्ञ डॉ. अजित पाटणकर, डॉ. सुरी, स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रीकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे व एम.के.सी.एल. नॉलेज फौडेशनचे संचालक विवेक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली देशभर राबविले जात आहे. या प्रदर्शन व विक्री उपक्रमात नवनवीन  तंत्रज्ञानाद्वारे विकसित बियाणे, विविध कृषी साहित्य व कृषी औजारे हे पाहण्यासाठी वारकरी, शेतकरी व ग्रामस्थ गर्दी करत आहेत. प्रास्तविकात स्वेरी अभियांत्रिकीचे शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांनी संशोधन विभागाची पार्श्वभूमी, मिळालेला निधी याविषयी माहिती सांगून शेतकऱ्यांसाठी असलेल्या सुविधा, बियाणे, औजारे, माती परीक्षण संच, पाणी परीक्षण, अनार दाणा, शेंगदाणे बियाणे, सोलार ड्रायर, तुळशी चहा, रोपे पेरणी यंत्र, जल शुद्धीकरण संयंत्र, लेजर लँड लेवलिंग, हवामान उपकरण, बायोगॅस , टिश्यू कल्चर, बीज रोपण संयंत्र असे विविध प्रकारचे तंत्रज्ञान प्रदर्शनात मांडल्या असून याची माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ. संतोष साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्प कार्यकारी अधिकारी गजेंद्र कुलकर्णी व प्राध्यापक वर्ग देत आहेत.

        अध्यक्षस्थानावरून बोलताना जेष्ठ विस्वस्त दादासाहेब रोंगे म्हणाले की, ‘अनादिकालापासून पंढरपूर हे पांडुरंगाच्या माध्यमातून समाजाला उर्जा देण्याचे कार्य केले जात आहे. सेवेचाच एक भाग म्हणून स्वेरीकडून विविध समाजसेवा होत आहे. या प्रदर्शनातील कृषिनिष्ठ उपकरणांच्या माध्यमातून वारकरी व शेतकऱ्यांना उपयुक्त उपकरणे उपलब्ध केली आहेत. याचा लाभ घ्यावा.’ असे सांगितले. आषाढी वारीचे लाईव प्रक्षेपण नॅशनल नॉलेजनेटवर्क च्या माध्यमातून या केले असून मुंबईच्या बी.ए. आर.सी. केंद्रातील संशोधक वारीचे दर्शन घेत आहेत. याप्रसंगी वारकऱ्यांचे प्रतिनिधी माणिक बेळूरकर (रा.वरवडे, ता. दिवसा, जि.- अमरावती), गोपाळपूरच्या सरपंच सौ. विजया जगताप, उपसरपंच प्रशांत जाधव, माजी उपसरपंच राजेंद्र लेंगरे, ग्रामपंचायत सदस्य सागर पवार, ग्रामविकास अधिकारी ज्योतीताई पाटील, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम. पवार, डॉ. संताजी पवार, प्रा. अंतोष द्याडे,  स्वेरीचे प्राध्यापक वर्ग, बालाजी सुरवसे यांच्यासह ग्रामस्थ व वारकरी उपस्थित होते.

अवश्य वाचा

शिघ्रे नदी बनलेय डंम्पिंग.