श्रीवर्धन 

       रायगड रत्नागिरीच्या विकासाचा ध्यास घेत पूर्ण ताकदीनिशी लोकसभेची निवडणूक लढवून विजय संपादन केलेले खा. सुनिल तटकरे हे आपल्या राजकीय प्रवासात सतत नवनवी क्षितीजे पादाक्रांत करत आहेत. आपल्या लोकाभिमुख कार्यशैलीच्या जोरावर त्यांनी लोकसभेपर्यंत मजल तर मारलीच पण तेवढ्यावरच ते थांबले नाहीत. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून तटकरे यांची पक्षाच्या लोकसभेच्या उपगटनेता पदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबद्दल त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांचे आभार मानले आहेत. आपण दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी व लोकांच्या हितासाठी या संधीचा पूर्ण उपयोग करेन, असा विश्वास त्यांनी ट्विटरवरून व्यक्त केला आहे.

अवश्य वाचा

शिघ्रे नदी बनलेय डंम्पिंग.