११ जुलै २०१९

      १२ जुलै २०१९ रोजी आषाढी निमित्त पंढरपूर येथे लाखो भाविक विठोबाच्या दर्शनासाठी जमतात.या वर्षी वनविभाग सोलापूर यांच्या तर्फे ही वारी 'पर्यावरण पूर्वक' वारी साजरी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.सोलापूर वनविभागाचे उपवनसंरक्षक प्रविणकुमार बडगे,सहाय्यक वनसंरक्षक जी.एस.साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली 'पर्यावरण पूर्वक वारी' हा विधायक उपक्रम यशस्वीरीत्या साजरा करण्यात येणार असल्याचे पंढरपूर वनक्षेत्राचे वनक्षेत्रपाल व्ही.एन.पोवळे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.वनक्षेत्रपाल पंढरपूर हे एक वर्षांपूर्वी रायगड जिल्ह्यातील म्हसळा वनक्षेत्राचे वनक्षेत्रपाल होते.अतिशय हुशार आणि मनमिळावू तसेच प्रत्येक कर्मचार्याशी आपुलकीने वागणारा अधिकारी म्हणून त्यांची रोहा वनविभागात चांगली ओळख होती.

       पोवळे यांनी त्यांच्या म्हसळा येथील कालावधीत वनविभागाच्या अनेक योजना यशस्वी पणे राबविल्या.आता ते पंढरपूर येथे वनक्षेत्रपाल म्हणून उत्तमरीत्या काम करीत आहेत.त्यांनी सांगितले की ३३ कोटी वृक्ष लागवड या उपक्रमांतर्गत सोलापूर वनविभागाचे उपवनसंरक्षक प्रवीणकुमार बडगे आणि सहाय्यक वनसंरक्षक जी.एस.साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी निमित्त पंढरपूर येथे वारीसाठी आलेल्या एक लाख दहा हजार भाविकांना १६ जुलै २०१९ रोजी परतीच्या प्रवासावेळी एक लाख दहा हजार रोपांचे वाटप करण्यात येणार आहेत.त्यासाठी परतीच्या वाटेवर एकूण १०० स्टॉल उभारण्यात आले असून प्रत्येक स्टॉलवर प्रत्येकी १००० रोपे ठेवण्यात आल्याचे पंढरपूरचे वनक्षेत्रपाल व्ही.एन.पोवळे यांनी सांगितले.

       या वारीमध्ये म्हसळा,श्रीवर्धन तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील हजारो भाविक सहभागी झाले असून त्यांनीही या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन वनक्षेत्रपाल व्ही.एन.पोवळे यांनी केले. भाविकांनी परतीच्या प्रवासात वड,चिंच,आवळा,सीताफळ,जांभुळ इत्यादी प्रकारची जीवनावश्यक रोपांचे वाटप ती रोपे आपापल्या घरी किंवा शक्य नसल्यास पंढरपूर-पुणे रोड, पंढरपूर-सांगोला रोड,पंढरपूर-सातारा रोड,पंढरपूर-महुद रोड,बार्शी,टेम्भुर्णी रोड च्या दुतर्फा रोपांची लागवड करण्याचे आवाहन व्ही.एन.पोवळे यांनी सांगून या मुळे पर्यावरण संतुलन मोठ्या प्रमाणात राखले जाईल असेही त्यांनी सांगीतले.

 

अवश्य वाचा