माणगांव 

       माणगांव तालुका शेतकरी कामगार पक्षाची बैठक कृषी उत्पन्न बाजार समिती माणगांव येथे जिल्हा चिटणीस ऍड,आस्वाद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ९ जुलै रोजी साय ४ वा संपन्न झाली. या वेळस जिल्हा चिटणीस यांनी शेतकरी कामगार पक्ष्याच्या प्रमुख कार्यकर्तेनक्षी सवांद साधला या वर्षी २ ऑगस्ट रोजी रोहा येथे शेकाप चा वर्धापन दिन संपन्न होणार असून माणगांव तालुक्यातील कार्यकर्तेनि मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ऍड आस्वाद पाटील यांनी केलं.

      तसेच यावेळी नुकतेच निवृत्त झालेले पोलीस निरीक्षक विक्रम जगताप यांचा सत्कार यावेळस करण्यात आला.तसेच या कार्यक्रमासाठी जिल्हा चिटणीस तथा जि.प. उप अध्यक्ष, अर्थ व बांधकाम सभापती ऍड आस्वाद पाटील, आर डी सी बँक चे व्हॉइस चेरमॅन सुरेश शेठ खैरे, जि प सदस्य चित्रा ताई पाटील , गौतम पाटील , ऍड, कस्तुब धामणकर, ऍड नितीन आब्रे,माणगांव तालुका चिटणीस रमेश मोरे, निलेश थोरे, विलास गोठलं, स्वप्नील सकपाळ, नथुराम   आडीत,प्रशांत मोरे, विलास मोरे,विजय आंबरे, नामदेव शिंदे राजेश कासरे, सखाराम जाधव,हसन्मिया बंदरकर, निजयंम फोफालुनकर, याकूब चीलवान, संजय गायकवाड, बटावले मामा, सत्वे यांची प्रमुख उपस्थिती होती.

      तसेच या वेळस प्रमुख कार्यकर्तेना जिल्हा चिटणीस मंडळ, तालुका चिटणीस मंडळ,पुरुगामी युवक संघटना, महिला आघाडी,विविध सेल च्या पद्धअधिकारी यांच्या नेमणूका करण्याचे आदेश ऍड,आस्वाद पाटील यांनी दिले. तसेच पक्ष वाढी साठी सुद्धा प्रत्येक प्रमुख कार्यकरतेनी प्रयत्न करण्यात यावे असे सुद्धा सांगण्यात आले. या वेळेस माणगांव तालुका चिटणीस रमेश मोरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले व माणगांव तालुक्यतुन जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी हजर राहू असे आश्वासन दिले.

       माणगांव तालुक्यातील ढासळलेला पक्ष हा रमेश मोरे यांच्या मुळे उभारी घेत असल्याचे दिसत आहे. तसेच तालुका चिटणीस रमेश मोरे यांनी पक्ष वाढी साठी केलेल्या कामाबद्दल ऍड आस्वाद पाटील यांनी कौतुक व अभिनंदन केले.

 

अवश्य वाचा

शिघ्रे नदी बनलेय डंम्पिंग.