अलिबाग :
जिल्हा शासकीय रुग्णालयाला वीज पुरवठा करणारी केबलची तात्पुरत्या स्वरुपाची दुरुस्ती आज महावितरणच्या कर्मचार्‍यांनी युद्धपातळीवर पुर्ण करुन दिल्यानंतर खंडी वीज पुरवठा पुर्ववत झाला. त्यामुळे चार दिवसांपूसन ठप्प असणारी एक्स रे, सिटीस्कॅन, सेवा गुरुवारी पाचव्या दिवशी पुर्ववत सुरु राहतील.
रविवारी जिल्हा रुग्णालयाला विज पुरवठा करणारी उच्च दाबाची केबल काही कारणांमुळे जळाली. यामुळे जिल्हा रुग्णालयातील वीजपुरवठा मोठया प्रमाणावर खंडीत झाला. या वीजपुरवठयावर अवलंबून असणारे ऑपरेशन थिएटरसह सिटीस्कॅन, एक्स रे या महत्वपुर्ण असलेल्या अत्याव्यशक सेवा तीन दिवस होऊनही ठप्प झाल्या होत्या. 
सार्वजनिक बांधकाम विभागाने (विद्युत) हे काम केले असल्याने याबाबतची जबाबदारी त्यांची असल्याचे निदर्शनास आल्यामुळे त्याबाबतची कार्यवाही केली जात असताना या कामाला 2 वर्षे पुर्ण झालीत की नाही याचीच माहिती नसल्यामुळे तसेच उच्च दाबाच्या केबलच्या जाँईंटचे साहित्य मुंबईहून मागवावे लागणार असल्याने विलंब होत होता. महावितरणचे कार्यकारी अभियंता एम एम तपासे यांनी याबाबत पुढाकार घेत सदर दुरुस्तीची कार्यवाही बुधवारी युद्धपातळीवर सुरु केली. सदर दुरुस्तीचे काम तात्पुरते स्वरुपाचे असून इतर आवश्यक साहित्य मुंबईहून आल्यानंतर कायमस्वरुपी दुरुस्तीचे काम होईल असे सांगण्यात आले.

अवश्य वाचा

शिघ्रे नदी बनलेय डंम्पिंग.