अलिबाग 

       निवृत्त उपजिल्हाधिकारी कृष्णाजी रामचंद्र नाईक यांचे वृद्धापकाळाने बुधवारी निधन झाले. ते 98 वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात तीन कर्तबगार मुले, आणि मुली, स्नुषा, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अलिबाग नगरपरिषदेचे गटनेते प्रदीप नाईक आणि माजी सरकारी वकील अ‍ॅड विलास नाईक, निवृत्त अभियंता मदन नाईक यांचे ते वडिल होत. त्यांच्या तीन कन्या मंदा, विजया या निवृत्त मुख्याध्यापिका तर कुमूदिनी या फॉरेस्ट ऑफिसर म्हणून कार्यरत होत्या.

       रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यात महसूल अधिकारी म्हणून जबाबदारी बजावणार्‍या कृष्णाजी नाईक यांनी धुळे जिल्ह्यात निवडणूक अधिकारी म्हणूनही काम पाहिले. उपजिल्हाधिकारी या पदावरुन निवृत्त होणार्‍या कृष्णाजी नाईक कर्तव्यदक्ष, प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळख होती. त्यांच्या पार्थिवावर अलिबाग येथील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यांच्या अंत्यदर्शनाला माजी मंत्री मीनाक्षी पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शेकापचे जिल्हा चिटणीस अ‍ॅड आस्वाद पाटील, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, जिल्हा परिषद सदस्य चित्रा पाटील, उपनगराध्यक्ष अ‍ॅड. मानसी म्हात्रे, ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष ल. नी. नातू, माजी आमदार देवेंद्र साटम, माजी सरकारी वकील अ‍ॅड प्रसाद पाटील, अ‍ॅड गौतम पाटील, सिताराम मढवी,संजय पाटिल द्वारकानाथ नाईक  यांच्यासह सर्व नगरसेवक, मंडणगड, रत्नागिरी येथील ऊनेक प्रतिष्ठित नागरीक, मोठया संख्येने व्यापारी वर्ग, वकील, डॉक्टर, पत्रकार तसेच सामाजिक क्षेत्रातील ऊनेकजण उपस्थित होते. त्यांचा दशक्रिया विधी हरिहरेश्‍वर येथे शुक्रवार 19 जुलै रोजी करण्यात येणार असल्याची माहिती नाईक कुटूंबियांच्या वतीने देण्यात आली.

अवश्य वाचा