सुतारवाडी दि. 10 

       रायगड जिल्ह्याचे खासदार मा.सुनिल तटकरे यांचा वाढदिवस सुतारवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी गीता बाग येथे हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत उत्साही वातावरणात पार पडला. खासदार सुनिल तटकरे यांना भेटण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सकाळी 9 वाजल्यापासूनच प्रचंड जनसमुदाय जमला होता. संपूर्ण सुतारवाडी चा परिसर गाड्यांनी हाउसफुल्ल झाला होता. आपल्या लाडक्या नेत्याला भेटण्यासाठी,  शुभेच्छा देण्यासाठी अनेकांनी सकाळ पासूनच रांगा लावल्या होत्या. साहेबांचे मंचावर आगमन होताच अत्यंत शिस्तबद्धपणे रांगेत आपल्या लाडक्या साहेबांना शुभेच्छा देऊन जमसमुदाय पुढे पुढे सरकत होता . केवळ रायगड जिल्ह्यातून नाही तर ठाणे , मुंबई,  रत्नागिरी, सातारा, बारामती,  मिरज अशा अनेक जिल्ह्यातून तसेच शहरातून हजारो कार्यकर्ते,  नेते मंडळींनी सुनिल तटकरे यांना भेटून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. पावसाने थैमान घातले होते.

        तरी सुद्धा अनेकांनी रांगेत उभे राहून आपला नंबर येई पर्यंत शिस्तीने साहेबांना शुभेच्छा दिल्या. असंख्य चाहत्यांनी आप आपल्या परिसरामध्ये शालेय विद्यार्थ्यांना तपासणी, नेत्र तपासणी,  खाऊचे वाटप रुग्णांना फळांचे वाटप वसतिगृहातील मुलांना भोजन,  वृक्षलागवड,  मॅरेथॉन असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  खासदार सुनिल तटकरे यांच्या वाढदिवसा निमित्त अनेक कार्यक्रम राबविले होते. असा वाढदिवस कोणत्या नेत्याचा एवढ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत साजरा झाला नसेल असे अनेकांनी आपले मत यावेळी व्यक्त केले. लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर खासदार म्हणून सुनिल तटकरे यांची निवड झाल्यानंतर अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. त्यापेक्षा वाढदिवसानिमित्त हजारो तळागाळातील जनसमुदायाच्या चेहऱ्यावर आनंद द्विगुणित झाल्याचे दिसत होते. मात्र या दिवशी सुतारवाडी परिसर हाऊसफुल्ल झाला होता.

अवश्य वाचा