पेण 

      आंतरराष्ट्रीय स्तरावर असणाऱ्या इनरव्हील क्लब ही  महिला संघटनेला उर्जा देणारी संस्था असून पेण इनरव्हील क्लबच्या माध्यमातून सदर महिला वर्ग समाजकार्याचे दर्शन घडवित असल्याचे प्रतिपादन रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे यांनी पेण येथे केले. पेण इनरव्हील क्लबचा पदग्रहण समारंभ महात्मा गांधी मंदिर येथे आयोजित करण्यात आला होतो. त्यावेळी त्या बोलत होत्या. 

       या कार्यक्रमास  पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मंगेश नेने, रोटरी क्लबचे अध्यक्ष सुजीत चौधरी, नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष दिपक गुरव, क्लबच्या माजी अध्यक्षा स्वाती मोहिते, विनया वाळींबे आदिंसह महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. 

     यावेळी पुढे बोलतांना अदिती तटकरे म्हणाल्या की सदर इनरव्हील क्लबच्या महिला मागील २२ वर्षे एकत्रितपणे निस्वार्थी काम करीत आहेत या सर्वांची जिद्द समाजकार्यासाठी प्रेरणादायी ठरत असल्याने भविष्यात आपणही या क्लब करीता मोलाचे सहकार्य करु असे त्यांनी शेवटी सांगितले. 

       या कार्यक्रमात पेण इनरव्हील क्लब च्या २०१९/२० या वर्षाच्या  नविन कार्यकारिणीत संयोगिता टेमघरे यांची दुस-यांदा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली तर सचिव पदी दिपश्री पोटफोडे, खजिनदार हिनाश्री व्होरा, आय. एस.ओ.रेणुका शहा, एडीटर तन्वी हजारे तर सुनंदा गावंड आणी ज्योती अवघडे यांची निवड करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते जिल्हापरिषदेच्या सात शिक्षकांचा तसेच शहरातील डॉक्टरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

अवश्य वाचा

शिघ्रे नदी बनलेय डंम्पिंग.