सुकेळी दि.०६:

रोहा तालुक्यातील नागोठणे जवळच असलेल्या सुकेळी येथिल जिंदल मांऊट लिटेरा झी स्कुलच्या सोनाली माळुसरे हिने साऊथ आफ्रिकेमधिल युगांडा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय वुडबाँल वर्ल्डकप स्पर्धेत पाचवे स्थान पटकावुन संपुर्ण रायगड जिल्ह्यासह रोहा तालुक्याचे नावलौकीक केले आहे.

सन २०१९ मध्ये साऊथ आफ्रीकेमधिल युगांडा येथे २५ मे ते ३१ मे २०१९ या दरम्यान दुस-या आंतरराष्ट्रीय बीच वुडबाँल वर्ल्डकप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या  स्पर्धेमध्ये जगातील एकुण १७ देशांनी सहभाग घेतला होता. यामध्ये भारतातुन एकुण १६ खेळांडुनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्या सर्व स्पर्धकांमधुन रायगड येथिल रोहा तालुक्यातील नागोठणे जवळच असलेल्या सुकेळी येथिल जिंदल मांऊट लिटेरा झी स्कुलची सोनाली माळुसरे हिने महिला गटामध्ये सांघिक व वैयक्तीक गटामध्ये पाचवे स्थान पटकावुन आपल्या शाळेचे नावलौकीक केले.

सोनाली माळुसरेच्या यशाबद्दल संपुर्ण रायगड जिल्ह्यासह रोहा तालुक्यातुन शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. तिच्या या यशाबद्दल जिंदल स्कुलच्या प्राचार्या श्रीमती. सविता शर्मा, उपप्राचार्या बिजल अवस्थी तसेच शिक्षकवर्ग यांनी तिच्या यशाबद्दल कौतुक केले.

अवश्य वाचा