खेड 

    कब्बडी हा खेळ केवळ महाराष्ट्रातल्या लाल मातीचा न राहता संपूर्ण देशासह आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याला नावलौकीकता मिळवून देणाऱ्या प्रो कब्बडी लीगच्या मांदिआळीत महाराष्ट्रातून निवड झालेल्या तीन पंचांपैकी खेड तालुक्यातील दोन पंचाची निवड ही खेड तालुका कब्बडी असोसिएशनच्या इतिहासातील एक अभिमामस्पद बाब.

   प्रो कब्बडी लीग-२०१९ च्या नव्या सिजनसाठी पंच म्हणून निवड झालेले राष्ट्रीय पंच श्री.विलास बेंद्रे सर ,व श्री.आशुतोष साळुंखे सर यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्या या गौरवास्पद कामगिरी बाबत त्यांना खेड तालुका कब्बडी असोसिएशनच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.तसेच खेड तालुका असोसिएशनच्या पंचांना मिळालेल्या या संधीचा पुरेपूर फायदा घेत स्पर्धेतील आपली उत्तमोत्तम कामगिरी पाहण्याची आम्हा सर्व कब्बडी प्रेमींना संधी मिळावी अशा भावनाही मान्यवरांनी व्यक्त केल्या.या संधीच्या माध्यमातून केवळ खेड तालुक्याचा नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्याच्या नावलौकिक वाढावा यासाठी रत्नागिरी जिल्हा कब्बडी असोसिएशनचे अध्यक्ष मा.श्री.सचिनभाई कदम, कार्याध्यक्ष श्री. नाना मयेकर, प्रमुख कार्यवाह श्री. रवींद्र देसाई खजिनदार श्री. सदानंद जोशी यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या. 

        या प्रसंगी खेड तालुका कब्बडी असोसिएशनचे अध्यक्ष श्री. सतिश उर्फ पप्पू चिकणे जिल्हा कब्बडी असोसिएशनचे कार्यकारणी सदस्य तथा तालुका कार्याध्यक्ष श्री.संमदभाई बुरोंडकर, उपाध्यक्ष श्री.महेशराव भोसले श्री.अनंत हंबीर, सहसचिव श्री.शरद भोसले. राजगुरु सर  जेष्ठ सल्लागार श्री.दादा बैकर,श्री.चंद्रकांत पार्टे,श्री. सुभाष आंबेडे सर ,सुजित फागे सर श्री.विलास बेंद्रे सर ,श्री.आशुतोष साळुंखे सर आदी उपस्थित होते.

अवश्य वाचा