कृषीवल

"बहूजन हिताय, बहूजन सुखाय"

आमच्या बद्दल

७ जून १९३७ रोजी कृषीवल साप्ताहिक म्हणून सुरु झाला आणि जनसामान्यांना आपले हक्काचे व्यासपीठ मिळाले. रायगड जिल्ह्यामध्ये अन्यायाविरुद्ध, शोषित- वंचितांसाठी, शेतकरी- कष्टकर्‍यांसाठी, सर्वसामान्यांसाठी अनेकानेक चळवळी उभ्या राहिल्या, नवनवे चळवळे निर्माण झाले. कृषीवल हा त्यावेळी रायगड जिल्ह्यातील जनतेचा चेहरा होता आणि आजही तो तसाच आहे. त्याकाळातील शेतकर्‍यांवरील अन्याय, वृत्तपत्रांचा खोटारडेपणा यामुळे संतापून उठलेले शेतकर्‍यांचे नेते नारायण नागू पाटील यांचा जेव्हा कडेलोट झाला तेव्हा आपणही एक वृत्तपत्र सुरु केल्याशिवाय पर्याय नाही याची जाणीव त्यांना झाली. प्रबळ इच्छाशक्ती आणि जिद्द या जोरावर नारायण नागू पाटील यांनी निधी उभा केला आणि १२०० रुपयांचा छापखाना तयार केला. वृत्तपत्राचे नावही चळवळीची दिशा दाखविणारे, चळवळीला पोषक ठरणारे असावे असा विचार करुनच नारायण नागू पाटील यांनी कृषीवल असे वृत्तपत्राचे नाव निश्‍चित केले. कृषीवलच्या या पहिल्या पिढीने कृषीवलचे संगोपन केले, त्याला वाढविले आणि शेतकरी, कामगार गोरगरीब जनतेला कृषीवलच्या माध्यमातून न्याय मिळवून दिला.

नारायण नागू पाटील यांच्यानंतर कृषीवलची सुत्रे प्रभाकर पाटील यांच्याकडे आली. प्रवाहाच्या विरोधात चालायचं असल्यानं जी संकटे नारायण नागू पाटील यांच्या काळात आली तशी संकटे प्रभाकर पाटील यांच्या काळातही आली. मात्र प्रभाकर पाटील यांनी अन्यायाच्या विरोधात हत्यार म्हणून कृषीवलचा वापर केला. बहूजन हिताय, बहूजन सुखाय या कृषीवलच्या ब्रीदवाक्यास अनुसरुनच प्रभाकर पाटील यांनी कृषीवल चालविले. प्रभाकर पाटील यांचे सुपुत्र आ. जयंत पाटील यांच्या हाती सुत्रे आल्यानंतर कृषीवलचा अंतर्बाह्य कायापालट झाला. ७ जून १९८९ रोजी कृषीवल पुर्ण आकारातील चार पानी अशा स्वरुपात प्रसिद्ध होऊ लागले. प्रगतीचे सारे टप्पे पार करीत आणि रायगडच्या सर्व सीमा मागे टाकत कृषीवल कोकणातील एक प्रतिष्ठित, विश्‍वासार्ह दैनिक बनले. ११९५ साली कृषीवलचा अंक सहा पानी केला गेला. त्या काळात मुंबई-पुण्याची बहुतेक वृत्तपत्रे रंगीत झाली होती. कृषीवलही रंगीत असावा असा ध्यास आ. जयंत पाटील यांनी घेतला आणि २००७ च्या गुढीपाडव्यापासून दैनिक कृषीवल सप्तरंगात प्रसिद्ध होऊ लागले. त्यावेळीही कृषीवलने रंग बदलले, आत्मा तोच अशीच जाहिरात केली. यानंतर जयंत पाटील यांच्या पत्नी सुप्रिया पाटील यांनी कृषीवलची सुत्रे हाती घेतली. यावेळी कृषीवलच्या प्रदीर्घ वाटचालीत अनेक वृत्तपत्रे बंद पडत असताना वाचकांची खंबीर साथ मिळाल्यामुळे भांडवलदारी आणि साखळी वृत्तापत्रांच्या स्पर्धेतही कृषीवल खंबीरपणे उभा राहिला.

वृत्तपत्र क्षेत्रातील नामवंत मंडळी, राजकीय क्षेत्रातील दिग्गज जेव्हाजेव्हा कृषीवलच्या अलिबागच्या कार्यालयाला भेट देतात तेव्हा त्यांना आश्‍चर्याचा धक्का बसतो. कारण आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील मराठी वृत्तपत्रांच्या कार्यालयापेक्षा कृषीवलचे कार्यालय उजवेच आहे. केवळ कार्यालयच नव्हे तर कृषीवलने आपला दर्जा देखील असाच ठेवला आहे. रायगड जिल्ह्यातून प्रसिद्ध होणार्‍या कृषीवलचे नाव संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. याचे संपूर्ण श्रेय कृषीवलच्या चारही पिढ्या म्हणजे केवळ मालकांच्या चार पिढ्या नव्हे तर कृषीवलने वाचकांच्याही चार पिढ्यांना पुरेपूर समाधान दिले आहे. चार पिढ्यांच्या कालखंडात आवड-निवड बदलली, परिस्थिती बदलली, अपेक्षा बदलल्या आणि बदलल्या या स्थितीनुसार कृषीवलही बदलत गेला. आज कृषीवल रायगड जिल्ह्यापुरताच मर्यादित न राहता रत्नागिरी, ठाणे, नवी मुंबई आदी जिल्हयांपर्यंत घरोघर पोहोचला आहे. आज कृषीवलची चौथी पिढी कृषीवलला अत्याधुनिक आणि व्यापकतेकडे घेऊन जाणारी ठरत आहे. कृषीवलची चौथी पिढी म्हणजे यंग ब्रिगेड चित्रलेखा नृपाल पाटील या महाराष्ट्राला नवी गवसणी घालण्यासाठी भविष्यवेधी पाऊले टाकत आहेत. एकूणच स्व. नारायण नागू पाटील यांनी कृषीवल नावाचा लावलेला इवलासा वेलू आज गगनावरी गेला आहे.

editor
editor
editor
editor
editor

अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा! कृपया आमच्या संपर्क पृष्ठावर जा

संपादक

आणखी वाचा

अवश्य वाचा

आणखी वाचा